संपुर्ण कर्जमाफी व सातबारा कोरा न केल्यास मोठे तीव्र आंदोलन होईल-कॉ. सुहास झाडे


सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी

वणी : नागपूर येथे झालेल्या एल्गार मोर्चामुळे शासनाने 30 जुन 2026 पर्यंत संपुर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभेने तुर्त आंदोलन थांबविले आहे.नागपूर येथील एल्गार मोर्चात घोंसा वागदरा जि.प.क्षेत्रातुन भाकप व मित्रपक्षाचे  कॉ.सुहास झाडे यांचे नेत्रुत्वात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. 

येथील शिवाजी महाराज चौकात झालेल्या प्रदर्शनात कॉ.सुहास झाडे यांनी ईशारा दिला कि, दिलेल्या तारखेपर्यंत संपुर्ण कर्जमाफी सरकारने केली नाही तर परत महाराष्ट्र राज्य किसान सभा शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करेल.तसेच घोंसा वागदरा गटात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व जनतेच्या न्यायासाठी लाल झेंडा सदैव संघर्ष करीत राहिल. 

याप्रसंगी एल्गार मोर्चास पाठींबा देण्यास निलेश झाडे,रविंद्र ढेंगळे,नितीन ढेंगळे,वसंता पानघाटे,मारोती दरेकार,अमोल वाभीटकर,प्रमोद गाढवे,दयानंद गोरे,प्रविण झाडे,ज्ञानेश्वर झाडे,गुलाब डाहुले,योगेश झाडे,गजानन बोधाने,ईश्वर मुसळे,रमेश विधाते,रूपेश झाडे यांचेसह घोंसा बोर्डा क्षेत्रातुन मोठया संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post