सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी
वणी : वणी घुग्गुस मार्गावर चारचाकी कार आणि ट्रक चा भीषण अपघात घडला. सदर घटना शुक्रवारीदि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लालगुडा गावालगत रोड वर घडली. यात कारमधील चार व्यक्ती ठार झाले होते. तर यामध्ये पाचवी चिमुकली ही गंभीर जखमीझाली होती तिला चंद्रपूर येथे रेफर केले असता तिथून रेफर नागपूर येथे करण्यात आले होते.
प्राप्त माहितीनुसार, रियाजद्दीन शेख (५५) हे भीमनगर वणी येथील रहिवासी आहे. त्यांचे लाल पुलिया परिसरात गॅरेज आहे. सध्या सुटी असल्याने ते त्यांच्या मुलीला कार शिकवीत होते. आज शुक्रवारी दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ते त्यांच्या ३ मुली व भावाची मुलगी घेऊन घुग्घुस रोडवर वाहन स्कोडा (O1AH 5700) ही कार घेऊन गेले होते. त्यांची मुलगी मायरा (17) ही कार चालवीत होती. दरम्यान लालगुड्याच्या समोर अगदी मंगल कार्यालयाच्या काही अंतरावर डिवायडरवरुन कार दुसऱ्या बाजूला गेली असता त्या बाजूने जाणाऱ्या ट्रकची कारला धडक बसली होती. अपघात होताच घटनास्थळावरील नागरिक मदतीसाठी धावून आले. कारला ट्रकची धडक इतकी भीषण होती की कार ड्रायव्हर साईडने पूर्ण चकणाचूर झाली होती. जमलेल्या लोकांनी अपघातग्रस्ताना बाहेर काढले. लगेच वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
डॉक्टरांनी मायरा शेख (१७), अमिराशेख, जोया शेख यांना मृत घोषीत केले. तर वडील रियाजद्दीन यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर त्यांच्या भावाची ४ वर्षाची मुलगी इनाया शकीरुद्दीन शेख तिला चंद्रपूच वरुन नागपूर येथे रेफर केले होते. तिथे उपचार सुरु असताना तिचाही मृत्यू झाल्याचे समजते. या अपघातात मृतांची संख्या पाच वर पोहचली असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेचा अधिक तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.
