मुकुटबन येथील बेमुदत कामबंद आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडला,कंपनीचा प्रतिसाद नाही

• RCCPL MP BIRLA कंपणी विरुद्ध कामगारांचे आंदोलन

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी

वणी : तालुक्यातील मुकुटबन येथे कार्यरत RCCPL MP BIRLA या सिमेंट कंपनीमधील काम करणारे कामगारांच्या समस्यांना घेऊन दि.6 नोव्हें.पासुन कंपनी मध्ये स्थापीत जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियन (आयटक) चे अध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्राचे लढाऊ कॉ. अनिल हेपट यांचे नेत्रुत्वात कामगारांनी कामबंद आदोलन सुरु केले.कामगारांनी या आंदोलनाला 100% प्रतिसाद देऊन आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. आंदोलनाला जनतेतून प्रचंड पाठींबा वाढत आहे.यामध्ये भाकप झरी तालुका,मुकुटबनच्या सरपंच सौ.मिना आरमुरवार,शेतकरी संघटनेचे झरी तालुका नेते बंडु पारखी,विवीध आदीवासी संघटनांचे नेते विठ्ठल उईके, मारोतराव कुसराम,शिवसेना (शिंदे)चे नेते चंद्रकात घुगुल, बाळु चेळे, भाजपचे झरी तालुकाध्यक्ष घुगुल, दिग्रसचे सरपंच निलेश यल्टीवार, सिंधी वाढोणाचे सरपंच निखाडे, उमरीचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष विनोद माथनकर, मानकीचे सरपंच पिंपळकर, वरझडीचे सरपंचा सौ. भोयर, मेंढोलीचे सरपंचा सौ.ढवस आदींनी आदोलन स्थळी उपस्थित राहून पाठींबा दिला, यावेळी अधिकृत पत्र दिले. सर्वांनी सांगीतले की,जर कंपनी मुजोरी करत असेल आणि कामगारांना न्याय देत नसेल तर जनभोक्ष वाढेल आणी याची जबाबदारी कंपनीची राहील. त्यामुळे कंपनी प्रशासनाने कामगाराचे हिताचे दृष्टिने सकारात्मक प्रतिसाद द्यावा,अशी याप्रसंगी मागणी केली. तिसऱ्या दिवशी सुरु असलेल्या आंदोलनाचे नेत्रुत्व जननेते कॉ.अनिल हेपटसह,अनिल घाटे,मोरेश्वर कुंटलवार,दिनेश शिटलवार,पंढरी नांदेकर,प्रविण कुळेकर,अनिल मोंडे,महादेव मेश्राम,कवडु केळझरकर,रोषन चामाटे,कलीम शेख,निरज खैरकर,अक्षय पुल्लीवार आदीं करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post