सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी
वणी : नगर परिषदने सन २०२५-२६ ते २०२८-२९ या आर्थिक वर्षाकरीता नविन प्रस्तावित चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकन बाबत वणीकर जनतेला काही दिवसापुर्वी नोटीस पाठविल्या होत्या त्यामध्ये चालू आर्थिक वर्षाचे करापेक्षा काही ठिकाणी ३ ते ४ पट आणि काही ठिकाणी ६ पट वाढीव कर प्रस्तावित केला होता की जो पुर्ण पणे महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीचे विरोधात होता तसेच लोकांचे आर्थिक नुकसान करणारे होते, त्यामुळे वणीतील जनतेच्या वतीने मा.माजी आमदार संजीवरेडडी बोदकुरवार व इतर भाजपा पदाधिकारी यांनी दि. १३/१०/२०२५ रोजी मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना त्याबाबत लेखी निवेदन देवून सदर प्रस्तावित कर आकारणीस सस्थगिती देणेबाबत विनंती केली होती. त्या निवेदनाची दखल घेवून मा. मुख्यमंत्री साहेबांनी सदर प्रस्तावित कर आकारणी स्थगित करणे संदर्भात आदेश पारीत केला व त्याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने नुकतेच नगर परिषद वणीला कळविले आहे.
या प्रंसगी मा. माजी आमदार संजीवरेडडी बोदकुरवार यांनी वणीकर जनतेला आश्वासित केले की ते सदैव त्यांच्या सेवेत कार्यरत असून ते आमदार नसतांनाही वणीकर जनतेला कुठलाही त्रास होऊ देणार नाही आणि वणीकर जनतेला दिलासा दिल्यामुळे त्यांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे वणीकर जनतेतर्फ आभार व्यक्त केला.
